सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (22:06 IST)

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात गुरुवारी (6 मे) कोरोनाचे 62 हजार 194 नवे रुग्ण आढळले, तर 853 मृत्यूंची नोंद झाली आहे.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6 लाख 39 हजार 075 वर गेली आहे.
 
महाराष्ट्रात 6 मेला 63 हजार 842 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याचा रिकव्हरी रेट 85.54 % वर गेला आहे.
 
गुरुवारी (6 मे) मुंबई मनपा क्षेत्रात 3028, ठाणे मनपा क्षेत्रात 822, पुणे मनपा क्षेत्रात 3164, तर नागपूर मनपा क्षेत्रात 2868 रुग्ण आढळले.
 
नाशिक जिल्ह्यामध्ये 6239, अहमदनगर जिल्ह्यात 3081, पुणे जिल्ह्यात 4153 रुग्णांची नोंद झाली आहे.
 
6 मेला एकूण 853 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. यापैकी 331 मृत्यू गेल्या 48 तासांत नोंदवण्यात आले असून 247 मृत्यू हे गेल्या आठवड्यातले आहेत. 275 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतले असल्याचं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलंय.