मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 5 मे 2021 (22:50 IST)

राज्यात चोवीस तासात 900 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी, प्रकरणे पुन्हा वाढली

राज्यात कोरोना विषाणूची 57640 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . यासह राज्यात कोरोना विषाणूमुळे 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 57006 लोकही बरे झाले आहेत. राज्यात 57 हजार पेक्षा अधिक नवीन रुग्णांसह संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 4,880,542 वर पोहोचली  आहे. त्याचबरोबर 900 हून अधिक मृत्यूनंतर राज्यात आतापर्यंत 72662 रुग्ण मृत्यूमुखी झाले आहेत. 
आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसात राज्यात 279200 चाचण्या घेण्यात आल्या. यासह राज्यात आतापर्यंत 28384582 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किरकोळ दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत सुमारे 4000 नवीन रुग्ण  आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 3882 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे. तर साथीच्या रोगाने आणखी 77 रुग्ण दगावले आहे.  
 
औरंगाबादमध्ये 981 नवीन प्रकरणे-
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 981 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि त्यासह महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संक्रमित होण्याची एकूण संख्या 127958 वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्ह्यात संक्रमणामुळे आणखी 43 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 2631 वर गेली.
 नवीन एकूण 981 प्रकरणांपैकी शहरात 374 प्रकरणे आणि गावात 607 प्रकरणांची नोंद झाली आहे. 
आतापर्यंत जिल्ह्यातील 115535 लोक या आजारातून मुक्त झाले आहेत.