शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (19:14 IST)

चेतावणी ! केंद्राचे वैज्ञानिक सल्लागार यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटे बाबत इशारा दिला. ते म्हणाले की आपण येणाऱ्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सतर्क असणे आवश्यक आहे. त्यांने विषाणूच्या नवीन रूपा बद्दल देखील सांगितले. 
कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत देशात ही परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी या साथीबद्दल अधिक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की व्हायरसचा प्रसार होताच कोरोना महामारीची तिसरी लाट होणार आहे, परंतु ही तिसरी लाट कधी आणि कोणत्या स्तरावर येईल हे स्पष्ट झाले नाही. ते म्हणाले की आपण या कोरोनाच्या नव्या लाटांसाठी तयारी केली पाहिजे.
विजयराघवन म्हणाले की कोरोना विषाणूचे वेगवेगळे रूप मूळ स्ट्रेन सारखे असतात ते इतर कोणत्या प्रकारे पसरत नाही. हे व्हायरस माणसाला संक्रमित करतो आणि शरीरात प्रवेश करून अधिकच संक्रामक बनते.
ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेन चा सामना करण्यासाठी लस अपडेट करावी लागेल यासह लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला असून अधिक  प्रकरणे झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढल्यामुळे रुग्णालयात बेड उपलब्ध नाही तसेच ऑक्सिजनचा देखील तुटवडा झाला आहे.त्या मुळे रुग्ण दगावत आहे. 
डॉ.राघवन म्हणाले की ज्या वेगाने देशात संसर्ग पसरत आहे अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट टाळता येणं अशक्य आहे. लाट कधी येईल या बाबत अनिश्चितता आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. लस अद्यावत करण्यावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.