सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (07:41 IST)

राज्यात विक्रमी 5 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण

राज्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. सोमवारी राज्यात विक्रमी 5 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्राने 5 लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. 
 
राज्यात 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण झाले होते. पण सोमवारी राज्याने 5 लाखांचा टप्पा आलोंडला आहे. त्यामुळे मुख्ममंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी सर्वांते अभिनंदन केले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखाहून अधिक जणांचं लसीकरण झालं आहे.  राज्यात  6155 लसीकरण केंद्र आहेत. ज्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे.