शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:54 IST)

हे लोक अखेर सुखरूप मायदेशी परतले

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील (चीन) भारतीयांना अखेर सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी  दुपारी एअर इंडियाचे विमान चीनच्या दिशेने रवाना झाले होते. यानंतर शनिवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी हे विमान ३२४ भारतीयांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झाले. 
 
या विमानातून आलेल्या सर्व लोकांना दिल्लीतील आरोग्य शिबिरात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु आहे. जेणेकरून यापैकी कोणालाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का, याची खातरजमा करणे शक्य येईल. या लोकांना आणखी किती काळ आरोग्य शिबिरात ठेवले जाईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चीनच्या वुहान विद्यापीठात मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिकायला आहेत. या विद्यार्थ्यांना विमानमार्गे थेट भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने चीनची परवानगी मागितली होती.