मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (16:26 IST)

हा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय - आदित्य ठाकरे

केंद्र सरकार ने जम्मू काश्मीर येथून कलम 370 हटविल्यानंतर सर्व स्तरातून मोदी सरकारचं एकदम जोरफर कौतुक होते आहे. आपल्या देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक असून, 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेनार आहे असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, एनडीएसाठी अभिमानास्पद असा हा क्षण आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठीच आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता. आदित्य यांनी सोशल मिडियावर ट्विट करत आपला आनंद आणि मोदी सरकारला पाठिंबा व्यक्त केला आहे.