रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (16:30 IST)

दारूच्या नशेत अॅसिड प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू

त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात दारू समजून अ‍ॅसिड प्राशन केल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. माहिती देताना त्रिपुरा पोलिसांनी सांगितले की, धलाईच्या मनू पोलिस स्टेशनमध्ये असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यसेवनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कृष्णा जय पारा येथील सचिंद्र रियांग (22), स्थानिक हजरधन पारा येथील अधिराम रियांग (40) आणि भाबीराम रियांग (38) असे आहे.
 
एसडीपीओने सांगितले की, या तिघांनी दारूच्या नशेत असताना चुकून अल्कोहोलऐवजी रबर शीटसाठी ठेवलेले अॅसिड सेवन केले. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, नेपालटिला पोलीस स्टेशन हद्दीतील डेमचेरा भागात राहणारे भाबीराम रियांग यांची पत्नी आणि मुले शुक्रवारी 82 मैल दूर असलेल्या कांचनचारा येथे त्यांच्या सासरच्या घरी गेले होते.
 
सोमवारी भाबीराम यांना त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आणि ते या अवस्थेत मुलाला भेटण्यासाठी कांचनचारा येथे गेले होते. सोमवारी रात्री कांचनचारा येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मृतांसह दहा जण सहभागी झाले होते. पार्टीत अति मद्य प्राशन केल्याने तिघांनी चुकून अॅसिड प्यायले. नशेत असताना दारू आणि अॅसिड यात फरक करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
घटनेनंतर दोघांनाही स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून त्यांची प्रकृती पाहता बुधवारी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.