सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (12:35 IST)

नवरा-बायकोच्या भांडणात चिमुकले रस्त्यावर

पती पत्नी मध्ये भांडण होणं सामान्य बाब आहे. पण दोघांच्या भांडणामुळे जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांना थंडी मध्ये रस्त्यावर सोडून पसार झाल्याची धक्कादायक घटनादिल्लीच्या जहागीरपुरी येथे घडली आहे. सदर घटना दिल्लीतील जागागीरपुरीत बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेचे व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये  कैद झाले आहे. 

सालेब बेगम असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला आणि 1 वर्षाच्या मुलाला पतीशी भांडण झाल्याचा राग येऊन चुलत बहिणीच्या घराच्या बाहेर ठेऊन आसामला निघून गेली. 
सालेब बेगम आणि तिच्या पती मध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले नंतर पती आसाममध्ये त्याच्या गावी निघून गेला. सालेब बेगमच्या मनात हा राग होता तिने रागाच्या भरात येऊन आपल्या चिमुकल्यांना थंडीत मध्यरात्री दिल्लीच्या जहागीरपुरी मध्ये राहणाऱ्या आपल्या चुलत बहिणीच्या घराच्या बाहेर सोडून चक्क आसामला निघून गेली. मुलांना खाली सोडून ती जाताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. 
या मुलांना त्यांच्या पालकांना देण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit