सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 मे 2023 (13:55 IST)

Train Accident :धावत्या ट्रेनमधून खाली पडला मुलगा, व्हिडीओ वायरल

train
ट्रेन ने दररोज लाखो लोक प्रवास करतात , ट्रेन मध्ये दारात उभे राहून काही तरुण स्टंट करताना दिसतात. हे तरुण दारात उभे राहून चालत्या ट्रेन मधून डोकावतात आणि बाहेर खांब्याला हात लावताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एका तरुणाचा हात बाहेर खांब्याला आदळतो आणि तो तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडतो. 
 
हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे माहिती नाही. पण हा तरुण दारावर उभे राहून हात बाहेर काढतो आणि बाहेरील झाडाला स्पर्श करण्याच्या नादात त्याचा हात खांब्याला लागतो आणि तो धावत्या ट्रेन मधून बाहेर खाली पडतो. 
हा व्हिडीओ ट्रेन मध्ये बसलेल्या एका प्रवाशाने घेतला असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओ मधील तरुणाची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला आहे या व्हिडिओला 8 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे.  
 
Edited by - Priya Dixit