रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (09:55 IST)

मुंबई विमानतळाबाहेर देसाईंविरोधात निषेध

शबरीमला मंदिरात प्रवेशाची जाहीर घोषणा करीत भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केले होते. शुक्रवारी पहाटे त्या कोचिन विमानतळावर पोहोचल्या मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केरळ सरकारने त्यांना विमानतळावरच रोखले. मंदिराकडे त्यांना जाऊही दिले नाही. त्यामुळे मंदिर प्रवेश न करताच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परतावे लागले. त्यानुसार, मुंबई विमानतळावर परतल्यानंतर त्यांच्यासमोर शबरीमला मंदिर प्रथेचे समर्थन करणाऱ्यांनी निषेध नोंदवला.
 
मुंबई परतल्यानंतर विमानतळावर निषेधकर्त्यांनी तृप्ती देसाईंविरोध घोषणाबाजी केली. तसेच देसाईंची पन्नाशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शबरीमला मंदिरात जायला हरकत नाही. त्यापूर्वी नको अशी भुमिका या निषेधकर्त्यांनी नोंदवली.