रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:40 IST)

पंचतारांकीत हॉटेलमधून टब बाथ हद्दपार होणार

tub bath in hotels

देशातील पंचतारांकीत हॉटेलच्या आलिशान बाथरूममधून बाथ टबला सुट्टी देण्याचा विचार  सुरु आहे. पंचरातांकीत हॉटेल क्षेत्रातील ओबेरॉय, ताज, आयटीसी यासारख्या पंचरातांकीत हॉटेल्सची चेन असलेले बड्या कंपन्या आपल्या बाथरुममध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. या कंपन्यांच्या मते त्यांच्याकडे येणारा ग्राहक कामात व्यस्त असल्याने तो बाथ टब मध्ये स्नान करण्याचे टाळतो. तो सहसा शॉवर घेतो. त्यामुळे बाथरुममधील हे भेलेमोठे बाथ टब काढून अत्याधुनिक शॉवर क्युबिक्स बसवण्याचा विचार करत आहेत. त्यातच पंचतारांकीत हॉटेलचे काही निकष बदलेले आहेत. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेलमधून आता टब बाथ हद्दपार होणार आहेत. 

टब बाथची जागा आता शॉवर क्युबिक्स घेणार आहे.  सध्यातरी हे बदल बेंगळुरु आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरातील पंचतारांकीत हॉटेलमधे हे बदल केले आहेत. पण, राजस्थान आणि केरळमधील हॉटेलमध्ये टब बाथ काढण्याचा इतक्यात विचार  नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले. त्याचबरोबर सरसकट टब बाथ काढण्याऐवजी जेथे टब बाथची गरज नाही तेथुनच ते काढण्यात येणार आहेत.