1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (21:56 IST)

किरीट सोमय्या प्रकरणात ट्विस्ट! ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचा पोलिसांचा दावा; परंतु…..?

kirit somaiya
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून तो व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनेने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
 
हे प्रकरण राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलेच गाजले होते.याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे.
 
तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.