गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (10:28 IST)

लग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू

Two children killed in Rajasthan
जयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.
 
या अपघातात 12 जण गंभीर भाजल्याचे वृत्त आहे. जोधपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या भुंगरा गावात ही घटना घडली. जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता म्हणाले, "हा एक अतिशय गंभीर अपघात आहे.
 
50 जखमींपैकी 42 जणांना एमजीएच रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत." मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज संध्याकाळी रुग्णालयात जखमींची भेट घेणार आहेत.

Edited by : Smita Joshi