शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (22:23 IST)

जम्मू काश्मीरच्या बंदीपोरात चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट आणि पुलवामामध्ये एसपीओ रियाझ अहमद यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी खोऱ्यात कारवाई केली आहे. बांदीपोरा येथील बेरार भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. या विशेष कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथील बेरार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आधीच सज्ज असलेल्या सुरक्षा दलांना बेरार परिसरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि विशेष मोहीम सुरू केली. 
 
या कारवाईत दोन्ही दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. आयजीपी काश्मीर म्हणाले, "अलीकडेच 11 मे रोजी साळींदर जंगल परिसरात दहशतवादविरोधी मोहिमेतून पळून गेलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाली होती. त्यांचा पाठलाग करण्यात आला असून ते बराड़ बांदीपोरामध्ये अडकले आहेत. त्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू आहे. 
 
12 मे रोजी बडगाम येथील तहसीलदार कार्यालयात घुसून तीन दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केली होती. काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. राहुल भटच्या हत्येविरोधात खोऱ्यातील अनेक भागात काश्मिरी पंडित निदर्शने करत आहेत.