EVM संबंधित फेसबुक पोस्ट करणार्या दोन लोकांना अटक, सोशल मीडियावर जरा सांभाळून...
पूर्वांचलमध्ये EVM बदलले गेल्याची अफवा असताना अनेक लोकं सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे. अशात फेसबुकवर अफवा पसरवणार्यांविरुद्ध अॅक्शन घेत पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे.
एक तरुण आजमगढ आणि एक जौनपुर येथील रहिवासी आहे जेव्हाकि वाराणसीच्या दोन लोकांविरुद्ध सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचसंबंधी प्रकरण दाखल केले गेले आहे. फेसबुकवर फर्जी फोटो अपलोड करून ईव्हीएम बदलण्याची अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक केली आहे. सूत्रांप्रमाणे मोहल्ला मीरमस्त रहिवासी फैजान खानने आपल्या फेसबुक वॉलवर बोगस फोटो टाकून जौनपुरमध्ये ईव्हीएम बदलण्याची अफवा पसरवली होती.
तसेच वाराणसीमध्ये 'पहडिया मंडीत ईव्हीएम भरलेल्या दोन गाड्या पोहचल्या' असे पोस्ट टाकणार्यावर पोलिसाने खटला दाखल केला आहे. हा मेसेज सोमवारी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करणार्या शशी गुप्ताविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ऐढे रहिवासी विनय कुमार विरुद्ध देखील फेसबुकवर ईव्हीएम संबंधी अफवा पसरवणे आणि दुष्प्रचार करण्याच्या आरोपात खटला दाखल केला गेला आहे.
सोशल मीडियाहून हे प्रकरण जिल्ह्याच्या लोकांपर्यंत पोहचल्यावर काही लोकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर मेसेज शेअर करणे सुरू केले. सोशल मीडिया सेलला अशा मेसेजसवर नजर असावी असे निर्देश दिले गेले आहेत.