शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (12:44 IST)

अनधिकृत दुकानं-घरांवर कारवाई, बुलडोझर चालले

हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीमुळे चर्चेत आलेल्या जहांगीरपुरीमध्ये आता महापालिकेच्या पथकाकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविण्याच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेचे पथक कारवाईसाठी पोहोचले. यावेळी अनेक बुलडोझरने कारवाई करून अवैध अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
 
जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकाम पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही बुलडोझर फिरत आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश येण्यापूर्वीच बुलडोझर जामा मशिदीवर पोहोचले. मशिदीचे गेट आणि प्लॅटफॉर्म पाडण्यात आले आहेत. मंदिराबाहेर बुलडोझरही तैनात आहे. याठिकाणी सध्या असलेली बेकायदा बांधकामे पाडण्याचीही तयारी सुरू आहे. लोकांनी येथे विरोध सुरू केला दगडफेक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
या जामा मशिदीजवळ हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला होता. मशिदीबाहेरील एका मोबाईलच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. याशिवाय मशिदीबाहेर बांधलेले प्लॅटफॉर्म आणि गेटही पाडण्यात आले. यावेळी मशिदीत उपस्थित काही लोकांनी विरोध केला.
 
मशिदीबाहेरचे अतिक्रमण पाडण्यात आले, तर काही अंतरावर असलेल्या एका मंदिराबाहेरील अतिक्रमणही पाडण्यात आले. यादरम्यान काही लोकांनी निदर्शनेही केली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. 
 
दरम्यान, डाव्या पक्षाच्या नेत्या वृंदा करात याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. प्रथम ती एका बुलडोझरसमोर उभ्या राहिल्या,त्यांना अधिकाऱ्यांनी बाजूस केले. करात म्हणाल्या, माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या  बुलडोझर ला रोखण्यासाठी मी आलो आहे.