रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (12:02 IST)

एकाच कुटुंबातील सात जण जिवंत जळाले

पंजाबमधील लुधियाना येथे एका झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जण जिवंत जळाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. ही घटना मंगळवारी रात्री 1.30 नंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे कुटुंब मक्कड  कॉलनीत एका झोपडीत राहत होते. 
 
अचानक आग लागल्यानंतर आरडाओरडा झाला. स्थानिक लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबातील सातही जण जिवंत जळाले होते. लुधियानाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (पूर्व) सुरिंदर सिंग यांनी सांगितले की ते स्थलांतरित मजूर होते आणि येथील टिब्बा रोडवरील नगरपालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ त्यांच्या झोपडीत झोपले होते. टिब्बा पोलिस स्टेशनचे एसएचओ रणबीर सिंग यांनी मयतांमध्ये पीडित दाम्पत्य आणि त्यांची पाच मुले अशी ओळख पटवली आहे. 
 
सुरेश सैनी (55), रोशनी देवी (50), राखी कुमारी (15), मनीषा कुमारी (10), चंदा कुमारी (08), गीता कुमारी (06), सनी (02) हे त्यांचे नाव आहे.तर अपघातात फक्त राजेश कुमार जिवंत आहे. हे सर्व बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी होते. रात्री जेवण करून रात्री आठ वाजता कुटुंबीय झोपले. 
 
प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण कुटुंबाला आग लागली असल्याचे समजते. लुधियानाच्या डीसी सुरभी मलिक आणि पोलिस आयुक्त कौस्तब शर्माही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासात गुंतली आहे. 
 
सात जणांचे असलेले सुखी कुटुंब काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले. कुटुंबात फक्त राजेश कुमार उरले आहेत. मंगळवारी रात्री तो मित्राच्या घरी झोपायला गेला होता. त्यामुळेच त्यांचा जीव वाचला. राजेशने सांगितले की, त्याचे वडील सुरेश कुमार भंगार विक्रेता म्हणून काम करायचे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.