सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (19:16 IST)

UPSC CSE 2020 Result: केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२० चा अंतिम निकाल जाहीर झाला, आपला रोल नंबर येथे तपासा

UPSC CSE 2020 अंतिम निकाल: UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या माहितीनुसार, नागरी सेवा परीक्षा (मुख्य) जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाली आहे. ज्या उमेदवारांची नावे मुलाखतीनंतर निवड यादीत आली आहेत त्यांचे रोल नंबर UPSC च्या वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वर पाहिले जाऊ शकतात. उमेदवार येथे दिलेल्या लिंकवर त्यांचा निकाल देखील तपासू शकतात.