राष्ट्र किंवा राष्ट्रीय शब्द वापरा : भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘राष्ट्रवाद’ या शब्दाला विरोध केला आहे. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी संबंधित असल्याचे भागवत म्हणाले. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाऐवजी राष्ट्र किंवा राष्ट्रीय असे शब्द वापरा, असे देखील त्यांनी सांगितले. झारखंडच्या रांचीमधील मोहारबादी येथे आयोजित केलेल्या ‘संघ समागम’ या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
भारताच्या निर्मितीमध्ये हिंदूंची जबाबदारी अधिक असल्यामुळे हिंदूनी आपल्या राष्ट्राप्रती अधिक जबाबदार बनले पाहिजे, असे भागवत आपल्या भाषणात म्हणाले. हिंदू हा शब्द सर्वांना एकत्र आणतो. तसेच हिंदू भारतातील सर्वच धर्मांचे प्रतिनिधित्व करतो, असेही भागवत आपल्या भाषणात म्हणाले.