शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (09:45 IST)

Vande Bharat Train: भोपाळहून दिल्लीला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला आग लागली,सुदैवाने जीवित हानी नाही

मध्य प्रदेशातील भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्यात आग लागल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी हजरत निजामुद्दीनला जाणारी वंदे भारत ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निघू लागताच बीना स्थानकाजवळ तिच्या K-C-14 कोचला आग लागली.आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली.या डब्यात सुमारे 36 प्रवासी होते, त्यांना कुरवाई कैथोरा येथे सकाळी 7 वाजता गाडी थांबवून खाली उतरवण्यात आले. डब्याच्या बॅटरीला आग लागल्याने हा अपघात झाला.

कुरवाई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझवली. आग केवळ बॅटरी बॉक्सपर्यंतच मर्यादित होती आणि विझवल्यानंतर इलेक्ट्रिकल आयसोलेशन केले जात असून लवकरच ट्रेन सुरू होईल.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 20171 वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 5.40 वाजता राणी कमलापती स्थानकावरून हजरत निजामुद्दीनसाठी रवाना झाली. बीनापूर्वी सकाळी 7.10 च्या सुमारास कुरवाई कैथोरा स्टेशनजवळ ट्रेनच्या सी 14 डब्यातून अचानक धूर निघाला आणि आग लागली. आग लागल्याचे पाहून ट्रेन थांबवण्यात आली.
 
आगीच्या वृत्ताने ट्रेनमध्ये घबराट पसरली आणि जवळपास सर्व प्रवासी त्यांच्या सामानासह ट्रेनमधून बाहेर आले. ट्रेनमध्ये 36 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. डब्याखालील बॅटरीला आग लागली. गाडीला आग लागल्याचे पाहून ग्रामस्थ धावले आणि बिना नगरपालिकेतून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले
बीना स्थानकातून अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.
 


Edited by - Priya Dixit