शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (11:45 IST)

महिलेच्या मृतदेहाला चिरडत गेली वाहने

death
दररोज रस्ते अपघातात अनेकांचे निधन होतात.उत्तरप्रदेशातील आग्रा- लखनौ महामार्गावर एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला आणि तिचे मृतदेह रस्त्यावरच पडून होते. दुर्देवाची गोष्ट म्हणजे तिच्या मृतदेहावरून चिरडत अनेक वाहने ये जा करत होते. त्यामुळे तिच्या देहाचे तुकडे- रस्त्यावर विखुरलेले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. 

सदर घटना रविवारी घडली आहे.महिलेचा मृतदेह रस्तावर पडलेला होता त्यावरून अनेक वाहने मृतदेहाला चिरडून जात होती. या मुळे तिच्या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावरच विखुरले होते. 
 
फतेहाबाद पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतकाचे ओळख अद्याप कळू शकली नाही.   
 
 Edited by - Priya Dixit