शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (11:12 IST)

देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांचा मृत्यू

तुळजाभवानीच्या  दर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना लातूर- नांदेड मार्गावर रविवारी पहाटे घडली.कार  चालकाचे  कारवरील नियंत्रण सुटून कार उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकून अपघात झाला.ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चौघे मित्र जागीच ठार  झाले. शिवराज लँकाढाई , मोनू कोतवाल, नार्मन कात्रे, व कृष्ण मंडके अशी मयतांची नावे आहेत. 

कार मध्ये पाच जण तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. कार नर्मन कात्रे चालवत होता. त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार उसाच्या ट्रॅक्टरला जाऊन पाठीमागून धडकली.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. 
पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातात झालेल्या जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे तर चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. 
 
Edited by - Priya Dixit