मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. काँग्रेससह 7 पक्षांनी हा प्रस्ताव मांडला होता.
 
सरन्यायाधीशांविरुद्धच्या नोटिसीवर 64 राज्यसभा सदस्यांसह 7 निवृत्त खासदारांच्या स्वाक्ष-या होत्या. हा प्रस्ताव फेटाळल्यानं विरोधकांनाही मोठा धक्का बसला आहे.  
 
महाभियोग प्रक्रियेचा वापर राष्ट्राध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट जज यांना हटविण्यासाठी केला जातो. यापूर्वी सिक्किम उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश पीडी दिनाकरण यांच्यविरुद्ध 2009 साली राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव प्रस्तुत करण्यात आला होता परंतू प्रस्ताव मांडण्यापूर्वीच दिनाकरण यांनी राजीनाम दिला होता.