बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. काँग्रेसने दिलेल्या उमेदवारापैकी सर्वात श्रीमंत उमेदवार प्रिया कृष्णा त्यांच्याकडे 1020.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोबतच  प्रिया कृष्णा यांच्याशिवाय एम.टी.बी. नागाराजू, डी.के शिवकुमार आणि अनिल लाड यांचंही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत नाव आहे. 
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रिया कृष्णा यांनी नामांकन पत्राबरोबर दाखल केलेल्या शपथ पत्रात 1020.5 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार एम.टी.बी नागाराजू यांच्याकडे 709.3 कोटींची संपत्ती आहे. राज्य सरकारचे मंत्री डी.के.शिवकुमार यांनाही काँग्रेसने तिकिट दिलं आहे. त्यांच्याकडे 619.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत बेल्लारी सिटीचे उमेदवार अनिल लाड यांचंही नाव आहे. ते 342.2 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.