रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विवाह पत्रिका पाठवा, तिरूपती बालाजीचा आशीर्वाद मिळवा

तिरूपती- विवाह बंधनात अडकणारे आता तिरूमाला स्थित प्रसिद्ध मंदिर वेंकटेश्वराचा आशीर्वाद मिळवू शकतात. मंदिर प्रशासन दंपतीला पोस्टाद्वारे ‘थलमबरालु’ (अक्षता) पाठविणारं आहे. मंदिरच्या अधिकाऱ्याने सांगितले की आशीर्वाद इच्छित लोकं येथून निःशुल्क कल्याणोत्सवम् (दररोज आयोजित होणार्‍या देवाच्या लग्नात) प्रयोग होणारी पवित्र हळद मिश्रित तांदूळ अर्थात अक्षता प्राप्त करू शकतात.
या मोफत योजनेचा लाभ केवळ नवविवाहित मिळवू शकतात असे मंदिराचे जनसंपर्क अधिकारी तलारी रवि यांनी सांगितले. आशीर्वाद मिळविण्यासाठी दंपती किंवा वधूवराच्या आईवडीलांना ‘कार्यकारी अधिकारी, टीटीडी केटी रोड, तिरूपती-517501’ या पत्त्यावर लग्नपत्रिका पाठवावी लागेल.
 
या सेवेसाठी टीटीडीची एक विशेष शाखा बनविण्यात आली आहे. लग्नपत्रिका मिळाल्यानंतर ही शाखाद्वारे दंपतीच्या समृद्धीसाठी देवाचा आशीर्वाद पाठविला जाईल.