शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (14:06 IST)

Viral video टोस्टला पाय लावून, त्यावर थुंकून पॅकिंग होत असल्याचं किळसवाण्या कृत्याचा व्हिडिओ

Viral video A disgusting video of toast being packed by spitting on it
आपण पण चहासोबत आवडीने कुरकुरीत टोस्ट खात असाल तर आता हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या किळस वाटू शकते. एका बेकरीतील धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे ज्यात लोक बेकरीमध्ये टोस्ट पॅक करत आहेत आणि त्यावर थुंकताना दिसत आहेत. पॅकिंगची ही निकृष्ट शैली पाहून लोकही संतापले आहेत.
 
व्हिडीओत दिसत आहे की ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावर पाय ठेवून बसले आहेत. ट्रेवर पाय चुकीने पडला नसून मुद्दामहून ठेवला आहे कळून येत आहे.
 
एका कामगार टोस्टवर पुन्हा पुन्हा पाय मारताना दिसत आहे. नंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकून, चाटून पॅक करत आहे.
 
हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण हे बघितल्यावर बाहेरचे ब्रेड आणि टोस्ट खाण्याची इच्छा मात्र मरुन जाईल.