बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 26 डिसेंबर 2021 (13:42 IST)

लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

लग्नाच्या वेळी नवरा आणि नववधूच्या मनात उत्साह असतो. नवीन आयुष्यात पाऊल टाकायचे म्हटले की एक रोमांच होतो. नववधू या वेळी लाजत असते. पण जर लग्नमंडपात एखाद्या नवरीचे रौद्र रूप पहिला मिळाले तर मग काय म्हणायचे. या नववधूच्या जे काही केले ते पाहून लग्नमांडवात सर्व थक्कच झाले.   
एखाद्याचा राग किती विकोपाला जाईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये एक नवरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला चांगलेच चोपताना दिसत आहे. नेमके झाले तरी काय ? या नवरींने होणाऱ्या नवऱ्याला लग्नमंडपातच का चोपले. 
नेमके काय घडले. 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की लग्नाच्या विधी करताना या नवरदेवाला गुटका खाण्याची तलफ आली आणि त्याने विधीच्या मध्येच पाठ फिरवून तोंडात गुटका घातला. हे बघून नवरीला संताप आला आणि तिने चक्क सर्वान समोरच नवरदेवाची धुलाई करणे सुरु केले. आणि नवरदेवाला आधी गुटका थुकून ये असे सांगितले. या घटनेचा व्हडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नवऱ्याची अशी धुलाई होत असताना कोणीच मध्ये पडले नाही. मुलीचे असे रौद्र रूप बघून नवरदेवाचा देखील काहीही बोलण्याचा असा धाडस झाला नाही. तो देखील विधी सोडून पाटावरून उभा राहतो. लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांपैकीच एकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून शिशलं मीडियावर पोस्ट केला. जो वेगाने प्रचंड व्हायरल झाला आहे.