पंतप्रधानांनी भाजपला दिली 1 हजाराची देणगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला 1000 रुपयांची देणगी दिली आहे. ट्विटरवर त्यांनी याची पावतीदे शेअर करत माहिती दिली आहे.
"भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रहित नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिलं आहे आणि त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने आजीवन सेवाकार्य करत आहेत.
"तुमचं छोटंसं दान या सेवाकार्याला बळकटी देण्याचे काम करेल. भाजपला बळकट करण्यासाठी, देशाला भक्कम बनवण्यासाठी योगदान द्या'" असं ट्विट मोदींनी केलं आहे.
पंतप्रधान मोदींबरोबरच अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनीही देणगी दिली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने निधी उभारण्याचा उपक्रम पक्षानं हाती घेतला आहे. त्यासाठी या सर्वांनी देणगी दिली आहे.