बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (17:05 IST)

राम मंदिरासाठी पुन्हा एकदा १९९२ करू - संघ

राम मंदिर मुद्दा पुन्हा जोर धरू लागला असून, त्यात संघाने कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात वेळ पडल्यास आम्ही राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी दिला. शुक्रवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. देव अर्थात श्रीराम सर्वांच्या हदयात आहत मात्र त्याचा वास मंदिरात असतो. त्यामुळे राम मंदिर व्हावे, ही आमची सर्वांची मनपासून इच्छा आहे. यामध्ये काही अडथळे जरी असले तरी न्यायालय हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय देईल असे आशा आहे. तरीही गरज पडल्यास १९९२ सारखं आंदोलन करण्यात येणार असे भय्याजी जोशींनी स्पष्ट केले. आम्ही सर्व न्यायव्यवस्थेचा आदर करतो. २०१०च्या अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, या प्रकरणी दिवाळीच्या आधी आनंदाची बातमी मिळेल अशी आमची इच्छा होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून राम मंदिरासाठी वेळ लागतोय हे वेदनादायी असल्याची भावना भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली. संघाने इतक्या परखड पणे प्रथमच आपले मत मांडले असून त्यामुळे पुन्हा वातावरण तापणार आहे.