शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (15:12 IST)

जैन मुनी विप्रन सागर महाराज यांची आत्महत्या

भागलपूर जिल्ह्यातील चंपानगर येथील श्री दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र मंदिरात जैन मुनी विप्रन सागर महाराज त्यांनी शरीर पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून चौकशी सुरु केली आहे. भागलपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या खोलीत एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये त्यांनी कोणत्या तरी गोष्टीमुळे चिंतेत असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जैन मुनी विप्न सागर जेवणानंतर 12:30 वाजता साधना करण्यासाठी गेले. संध्याकाळी साडे चार वाजता ते भाविकांना भेटतात. पण ते खोलीतून बाहेर न आल्याने नंतर गार्डने दरवाजा तोडला तर सगळ्यानाच धक्का बसला.
 
जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा जैन मुनींचं शरीर पंख्याला लटकलेलं होतं. यानंतर लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोस्टमॉर्टमसाठी साध्वी आणि भाविकांनी विरोध केला. पण पोलिसांनी समजावल्यानंतर त्यांचं शरीर रुग्णालयात पाठवण्यात आलं.