काय सांगता, परीक्षेत 300 पैकी 315 गुण मिळून विद्यार्थी नापास
परीक्षा कोणत्याही इयत्ताची असो प्रत्येक विद्यार्थी परीक्षेत आपले चांगले देण्याच्या प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात जे पैकीच्या पैकी गुण मिळवतात. पण विद्यार्थ्यांच्या परीक्षेत पैकी पेक्षा जास्त गुण मिळवून देखील विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकाच्या बंगळुरूतील एका संस्थेत घडून आला आहे.
या संस्थेत 300 गुणांचा नर्सिंगचा पेपर होता त्यात अनेक विद्यार्थ्यांना 300 पैकी 310 ,315 गुण मिळाले आहे. असे असून देखील विद्यार्थी नापास झाले आहे.
ही बाब विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना समाजतातच त्यांनी चौकशी केल्यावर चूक कुठे आणि कशी झाली हे समजले.
झाले असे की BSC नर्सिंग मध्ये एक अतिरिक्त विषय होता त्याचे गुण अंतिम निकालात समाविष्ट होणार नव्हते. तरीही तपासणाऱ्या शिक्षकाने त्यात गुण जोडलं त्यामुळे अंतिम निकालात अंतर आढळले आणि अंतर्गत मूल्यांकनाचे काही गुण जोडण्यात आल्याने ही चूक झाल्याची माहिती विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाने दिली.
काही विद्यार्थ्यांना पूर्ण गुणांपेक्षा जास्त गुण पाहून धक्काच बसला तेव्हा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा निकाल नाकारला असून नंतर पुन्हा निकाल जाहीर केल्यावर काही पास झालेले विद्यार्थी नापास झाले.
Edited By- Priya Dixit