बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (14:58 IST)

काय सांगता ; 24 तासात 3 वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

What do you say Attempted suicide 3 times in 24 hours
एका माणसाला जीवनाचा इतका तिरस्कार झाला की त्याने 24 तासांत तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. बेशुद्ध होईपर्यंत त्याने आधी मद्यपान केले , शुद्धीवर आल्यावर.विष प्राशन केले, नंतर गळफास घेतला पण सुदैवाने तिन्ही वेळा तो वाचला.
 
हे प्रकरण आहे मध्यप्रदेशातील बैतूलच्या चिंचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठाखेडाचे एका तरुणाला आपले आयुष्य नकोसे झाले त्याने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला प्रथम त्याने अधिक मद्यपान करून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला त्यात तो अपयशी झाला. नंतर त्याने विषप्राशन केले. तरीही तो वाचला तिसऱ्यांदा त्याने गळफास घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. रवींद्र कटारे (35) असे या तरुणाचे नाव आहे. तो टॅक्सी चालक असून त्याची स्वतःची टॅक्सी आहे. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय माहोरे सांगतात की , तरुणाने बेशुद्ध होई पर्यंत मद्यपान केले, शुद्धीत आल्यावर त्याने विषप्राशन केले. तरीही त्याला काहीच झाले नाही. नंतर त्याने गळफास घेतला. त्याच्या पोटातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विनोद कटारेरवींद्रच्या भावाने  सांगितले की, रवींद्र ने काही विषारी पदार्थ खाऊन गळफास घेतल्याची माहिती मिळतातच त्याला तातडीने रुग्णालयात नेले. कदाचित त्याचे त्याच्या बायकोसह काही वाद झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल घेतले असावे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून उपचाराला काहीही प्रतिसाद देत नसून त्याची प्रकृती गंभीर आहे. 
चिंचोली पोलिसांना रविंद्रची अवस्था चिंताजनक असल्यामुळे काही विचारता आली नाही.पोलीस ठाण्याचे टी आय अजय सोनी यांनी सांगितले.पोलीस या प्रकरणाचा  तपास करत आहे.