बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:36 IST)

इंदूर :ब्लू व्हेल गेमचा आणखी एक बळी जाता जाता वाचला

ब्यू व्हेल गेममुळे इंदूरमधल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी जाता जाता वाचला आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी, शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या मित्रांनी त्याला पकडून शिक्षकांच्या ताब्यात दिलं. शिक्षकांनी विचारणा केली असता तो ब्लू व्हेल गेमच्या पंचवीसाव्या स्टेजला असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुलाने या गेममुळे आत्महत्या केली होती. तर सोलापूरहून एक मुलगा याच गेममुळे पुण्यात येऊन पोहोचला होता.