शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (08:16 IST)

काय म्हणता, पंतजलीचा कोरोना औषध निर्मितीच्या दाव्यावरून यू-टर्न

'कोरोनिल' हे कोरोनावरील औषध मिळाल्याचा दावा बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एवढंच नव्हे तर औषध बाजारात आणलं होतं. यावरून खूप गोंधळ झाला होता. आता या औषधावरून पतंजली आयुर्वेद कंपनीने यू-टर्न घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पतंजलीने उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पंतजलीने कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. 
 
बाबा रामदेव यांनी आपली कंपनी पंतजली आयुर्वेदचे सीईओ आचार्य बालकृष्णने पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर आयुर्वेदिक औषध मिळाल्याचा दावा केला. कोरोनिल नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. केंद्रीय आय़ुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.
 
या औषधाचं मंगळवारी अनावरणही करण्यात आलं. ज्यानंतर केंद्राकडून Patanjali Ayurved Limited पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली असून, या औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे.