1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (11:49 IST)

अनैतिक संबंधाचा संशयावरून पत्नीची मुलांसमोर हत्या

murder
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील मुस्तफाबाद कॉलोनीत लोणी परिसरातुन अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने मुलांसमोर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मार्च रोजी घडली आहे. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला आहे. अयुब असे या आरोपीचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अयुब नावाच्या व्यक्तीने पत्नी फोनवर बोलत असताना आपल्या चार मुलांच्या समोर पत्नीची धारदार फावड्याने हल्ला करत हत्या केली. या घटनेच्या वेळी मोठा मुलगा कामा निमित्त बाहेर गेला होता. पत्नीची हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला. आईची अवस्था पाहून मुले घाबरून रडू लागले. 

मोठ्या मुलाने घरी आल्यावर आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पहिले आणि आरडाओरड केला. मुलांचा आरडाओरड ऐकून शेजारचे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचली त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि आरोपीला पकडण्यासाठी पथके नेमली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit