सोमवार, 19 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (15:38 IST)

आता लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफाय

wifi service in train
येत्या वर्षभरातच प्रवाशांना लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायची सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे. येत्या दोन वर्षात ही सेवा सुरु केली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर मोफत वायफाय पुरवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रकल्प यशस्वीपणे राबवला जात आहे. याकडे पाहाता येत्या  वर्षभरात मुंबईतील लाखो प्रवाशांप्रमाणेच देशभरातील 100 प्रमुख मेल, एक्स्प्रेसमध्ये मोफत वायफायचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. पीपीपी (सार्वजनिक, खासगी सहभाग) तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यासाठी रेलटेल कंपनीने पुढाकार घेतला आहे.