सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (16:52 IST)

काळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात भयानक घटना उघड झाली आहे. या ठिकाणी बायकोने आपल्या नवऱ्याला झोपेत जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पती काळा असल्याने पत्नीने हे भयानक असे टोकाचे पाऊल उचलले आहे, घटनेनंतर तात्काळ पतीला रुग्णालयात दाखल केले, मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. बरेलीतील खुर्द फतेहगढ पोलीस ठाणेच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, बावीस वर्षीय महिलेने आपल्या नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे. पतीस रुग्णालयात नेले मात्र त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामध्ये महिलेचे नाव प्रेमश्री आहे. तिला पोलिसांनी अटक केल्याचंही सिंह यांनी सांगितल. पाहाटेच्या साखर झोपेत सत्यवीर सिंह घरातील खाटावर झोपले होते. याचवेळी पत्नी प्रेमश्रीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. यावेळी पेट्रोलचे काही थेंब प्रेमश्रीच्या पायावरही पडले. ज्यामुळे तिचे पाय देखील भाजले आहेत. सत्यजीत ओरडला होता. हे ऐकून तेथे घरातील इतर लोक आले त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. प्रेमश्रीला सत्यवीर लग्न झाल्या पासूनचा आवडत नव्हता, त्याला ती सातत्याने घालून-पाडून बोलत असे. मात्र  सत्यवीर तिच्यावर खूप प्रेम करत असे. त्यामुळे, आपली पत्नी असे काही करेल, याचा थोडाही अंदाज सत्यवीरल आला नाही. पोलिसांनी पत्नी प्रेमश्रीविरुद्द 302 चा गुन्हा दाखल केला आहे.