1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Woman stabbed to death by ex-partner in Mohali

३५ सेकंदांत ३० वार! ब्रेकअपनंतर पॅचअप नाकारणाऱ्या माजी प्रेयसीची ऑफिसमध्ये घुसून हत्या

मोहाली येथील सेक्टर ६६ (फेज ११) मधील एका नामांकित कंपनीत एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डिंपल नावाच्या एका तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने ऑफिसमध्ये घुसून चाकूने वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
 
६ महिन्यांपूर्वी झाले होते ब्रेकअप
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डिंपल आणि आरोपी हरविंदर सिंग उर्फ 'हॅरी मान' हे दोघेही पंजाबच्या पटियाला येथील रहिवासी होते आणि मोहालीत नोकरी करत होते. त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते, मात्र सुमारे ६ महिन्यांपूर्वी काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर हरविंदर हा मानसिक तणावाखाली होता. तो डिंपलसोबत पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होता, पण डिंपलने त्याच्यापासून पूर्णपणे अंतर राखले होते.  
 
ऑफिसमध्ये ३५ सेकंदात ३० वार
घटनेच्या दिवशी संध्याकाळी जवळपास ७ वाजता डिंपल तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्याच वेळी हरविंदर तिथे पोहोचला आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की, हरविंदरने अचानक त्याच्याकडे असलेला चाकू काढला आणि अवघ्या ३५ सेकंदात डिंपलच्या मानेवर आणि शरीरावर २५ ते ३० वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.  
 
हल्ल्यानंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
डिंपलवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी हरविंदरने स्वतःवरही चाकूने अनेक वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले.  
 
पोलिसांची माहिती
मोहाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंपलचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी हरविंदरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आरोपीचे आई-वडील परदेशात राहतात. प्राथमिक तपासात हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून आणि रागातून घडल्याचे दिसून येत आहे. आरोपी शुद्धीवर येताच त्याला तात्काळ अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.  
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचे आंदोलन, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरले