सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंगेर (बिहार) , शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (17:34 IST)

महिला मुलासह रेल्वेखाली आली

एक महिलेनं तिच्या लहान मुलासह रेल्वे सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उडी मारली. त्यानंतर तिचा तोल गेला, आणि ती मुलासह रेल्वेच्या खाली आली. जवळपास दोन मिनिटे ती मुलासह रेल्वेच्या खाली होती. पण सुदैवाची बाब म्हणजे तिला काहीही झालं नाही. रेल्वे निघून गेल्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. 
 
बिहारमधील (Bihar जमालपूर रेल्वे स्टेशनवरील ही घटना आहे. गुरुवार (2 सप्टेंबर) दुपारी 4 वाजून 38 मिनिटांनी हा प्रकार घडला. जमालपूर स्टेशनवरुन भागलपूरला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमधून या महिलेनं मुलासह प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि ती तोल गेल्यानं रेल्वे खाली आली. प्लॅटफॉर्मवरील आरपीएफ आणि जीआरपी स्टाफनं त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत ती महिला रेल्वेच्या खाली आली होती. या घटनेनं स्टेशनवरील सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला होता. महिला आणि मुलाच्या जीवाचं काय झालं असेल? अशीच भीती सर्वांच्या मनात होती. त्या महिलेवर मात्र 'काळ आला असला तरी वेळ आली नव्हती'. त्यामुळे इतक्या मोठ्या घटनेनंतरही त्यांना काही झाले नाही. प्लॅटफॉर्मवरील आरडाओरड ऐकून रेल्वे पोलीस सतर्क झाले. त्यांनी तातडीनं रेल्वे थांबवून दोघांना बाहेर काढलं.