गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (13:58 IST)

उत्तर प्रदेश निवडणुकांआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते - राकेश टिकैत

उत्तर प्रदेश निवडणुकांआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते, असं वादग्रस्त विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे. तसंच भाजपपेक्षा घातक पक्ष कोणताही नाही, असंही ते म्हणााले आहेत.
 
हरियाणाच्या सिरसा येथे शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
 
ते म्हणाले, "उत्तर प्रदेशात ते हिंदू-मुस्लीम मुद्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या ते प्रयत्नात आहेत. निवडणुकीआधी एखाद्या हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते. त्यांच्यापासून सावधान राहा."
 
"या देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. भाजपपेक्षा कोणताच पक्ष घातक नाही. ज्या लोकांनी पक्ष उभारला त्यांनाच आज कैद केलं आहे. ज्या एसडीएमने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहेत. हे आम्हाला खलिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू," असंही राकेश टिकैत म्हणाले.