शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (08:03 IST)

अहमदाबादमार्गे नाशिक-इंदूर विमानसेवेचा पर्याय उपलब्ध

नाशिकच्या ओझर येथून अहमदाबाद मार्गावर विमानसेवा देणारी जेट कंपनी २ सप्टेंबरपासून अहमदाबादमार्गे नाशिक-इंदूर विमानसेवेचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. या सेवेमुळे नाशिककरांना आता थेट इंदूरचा पर्याय उपलब्ध झाला असून, या सुविधेमुळे शहराच्या धार्मिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
 
मार्च महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाने सर्व प्रकारच्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता टप्प्याटप्याने पुन्हा सेवा सुरू करण्यात आल्या. सध्या स्टार एअरवेज कंपनीची बेळगाव- नाशिक सेवा सुरू झाली. ट्रू-जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद सेवा सुरू झाली. एअर अलायन्स कंपनीची नाशिक- अहमदाबाद- दिल्ली व नाशिक- पुणे- बेळगाव हवाई सेवा सुरू झाली. आता ट्रु जेटने आपल्या सेवेचा विस्तार करत अहमदाबादहून पुढे इंदूरपर्यंत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विमानसेवेची वेळ अशी
अहमदाबादहून सायंकाळी ५.०५ वाजता उड्डाण घेऊन सायंकाळी ६.२० वाजता नाशिक विमानतळावर पोहोचणार आहे. नाशिकहून सायंकाळी ६.५० वाजता अहमदाबादसाठी निघून अहमदाबाद विमानतळावर रात्री ८.०५ वाजता लँडिंग करणार आहे. अहमदाबादहून रात्री ८.३० वाजता निघून रात्री ९.४० वाजता इंदूर विमानतळावर लँडिंग करेल. रात्री १०.०५ वाजता इंदूरहून निघून रात्री ११.१५ वाजता अहमदाबादला लँडिंग करणार आहे. नाशिक-अहमदाबादसाठी किमान २४०० रुपये पडणार आहे तर नाशिक- इंदौर साठी किमान भाडे ३४०० रुपये पडणार आहे.