रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीयांच्या घामातून ताजमहालची उभारणी: योगी

प्रेमाचे प्रती समजल्या जाणार्‍या ताजमहालवरून राजकारण रंगले असताना आता यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे. ताजमहाल कोणी बांधला आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो भारतीय ममजुरांच्या घामातून उभारला गेला, हे महत्त्वाचे आहे असे ‍आदित्यनाथ यांनी म्हटले.
 
याआधी गद्दरांनी बांधलेला ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे विधान उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले होते.
 
भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटल्यामुळे मोठा वाद झाला होता. याबद्दल बोलतान, ताजमहाल भारतीय कामगारांच्या घामातून उभारण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. पर्यटनाच्या दुष्टिकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे.