तरुणाने प्रेयसीसह स्वतःच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली
केरळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.तिरुअनंतपुरममध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीसह कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.या हल्ल्यात तरुणाची आई गंभीर जखमी झाली आहे. हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. आरोपी तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.
आरोपीने आजी, काका, काकू, भाऊ आणि मैत्रिणीची हत्या केली.आरोपीने त्याच्या आईवर देखील प्राणघातक हल्ला केला. आई या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
हत्येनंतर, आरोपीने तिरुअनंतपुरममधील वेंजाराममोड्डु पोलिस ठाण्यात स्वतःला शरण आले आणि हत्येची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने हे गुन्हे तीन वेगवेगळ्या घरात केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कबूल केले की त्यानेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु रुग्णालयात गेल्यानंतर तो वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्जबाजारी होता आणि कुटुंबाने कर्ज फेडण्यास नकार दिला चा राग त्याला आला आणि त्याने हे कृत्य केले. मात्र पोलिसांना आरोपीच्या या दाव्याबद्दल शन्का असून पोलीस पुढील तपास करत आहे .
Edited By - Priya Dixit