सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्‍ली , शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (11:31 IST)

हिंदू देवी-देवतांच्या विरोधात होते झाकीर नाईक यांचे भाषण: गृह मंत्रालय

विवादांमध्ये असणारे इस्लामी प्रचारक झाकीर नाईकाच्या एनजीओवर लावण्यात आलेल्या पाच वर्षांच्या प्रतिबंधाला सरकारने योग्य ठरवले आहे. सरकारचे म्हणणे आहे की नाईक, अल-कायदाचे माजी प्रमुख आणि जगातील सर्वात खूंखार दहशतवादी असलेल्या ओसामा बिन लादेनचा गुणगान करत होते आणि हिंदू देवी देवतांविरुद्ध भाषण देत होते.  
 
सरकारने दोन दिवस आधीच नाईकाचे एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आईआरएफ) वर बेकायदेशीर क्रियाकलाप निरोधक कायद्याच्या  अंतर्गत प्रतिबंध लावला होता. या बॅनचे समर्थन करत केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की नाईक ओसामा यांचे गुणगान करत होते आणि म्हणत होते की प्रत्येक मुसलमानाला दहशतवादी असायला पाहिजे. त्याचबरोबर ते असा ही दावा करत होते की जर इस्लामने वास्तवात इच्छा दर्शवली असती तर 80 टक्के भारतीय हिंदू राहिले नसते.