उरण : पोलिसांनी जाहीर केले रेखाचित्रे
रायगड जिल्ह्यातील उरण शहरात संशयित चार बंदुकधारी घुसले आहेत.या संदर्भातील मुंबई पोलिसांनी दोन रेखाचित्र जारी केले आहे. उरण येथील शाळकरी विद्यार्थांनी संशयितांना पाहिले होते त्यांच्या माहिती वरून ही रेखाचित्र तयार करण्यात आले आहेत . उरण आणि मुबई येथे मोठी सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. मात्र अजून तरी हे संशयित आढळून आले नाहीत. तर दुसरीकडे कठोर तपासणी करून सुद्धा कोणताही सुगावा लागला नाही. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या संदर्भात कसून चौकशी करत आहे.
