गुजरातमधील दंगल मोदींमुळेच : राहुल
पटेल समाजाच्या आरक्षणावरुन गुजरातमध्ये सुरु असलेल्या दंगलीस पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा घाणाघती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौ-यावर आहेत. पोर शहराजवळ शेतकºयांच्या सभेत बोलताना ते म्हणाले, गुजरातमधील सद्यस्थितीसाठी मोदींचे द्वेषाचे राजकारणच कारणीभूत आहे. जनतेमध्ये द्वेष पसरावा व त्यांनी एकमेकांशी लढावे हेच त्यांना हवे आहे, याचा फायदा मोदींशिवाय अन्य कोणालाही मिळत नाही. मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचे सरकार आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.