...तोपर्यंत आधार कार्ड ‘निराधार’
‘प्रायव्हसी’ हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही यावर घटनापीठाकडून निर्णय येईपर्यंत विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्डची सक्ती करू नये, असा अंतरिम न्यायालयाने दिला आदेश दिला.
आधार कार्ड सक्तीने काढायला लावणे आणि सरकारी योजनांचे लाभ या काडार्शी निगडित करणे म्हणजे नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’च्या मूलभूत हक्कावर गदा आणणे आहे, या मुद्द्यावर अनेक याचिका केल्या गेल्या. तसेच आधारसाठी संकलित केलेली बायोमेट्रिक माहिती फौजदारी गुन्ह्याच्या तपासाच्या कामी पोलिसांना उपलब्ध करून देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे अपीलही सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यात केंद्र सरकारने प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. या मुद्द्यांवर निकाल देण्यास न्या. जे. चेलमेश्वर, न्या. शरद बोबडे व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या. त्याचा निकाल होईपर्यंत खंडपीठाने आधारसंबंधी अंतरिम आदेश दिले.
