1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. त्रुटी असूनही ‘तेजस’हवाई दलात दाखल होणार

त्रुटी असूनही ‘तेजस’हवाई दलात दाखल होणार

नवी दिल्ली- वायुदलाला विमानांचा मोठा तुटवडा जाणवत असल्यामुळे काही त्रुटी असूनही ‘तेजस’ हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान सेवेत दाखल करून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 
‘तेजस’ या स्वदेशी लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी मागील 32 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक दोषांमुळे शस्त्रसाठा घेऊन उड्डाण करणे विमानाला कठीण जात आहे. यावर उपाय म्हणून दोष दूर करण्यासाठी विदेशी तज्ज्ञ आणि विदेशी यंत्रांची मदत घेऊन ‘तेजस’ सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 60 टक्के स्वदेशी आणि 40 टक्के विदेशी तंत्रज्ञान वापरलेले ‘तेजस मार्क 1-ए’ हे विमान लवकरच वायुदलात दाखल होणार आहे.