1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
  4. पंतप्रधान मोदी आज वाराणसीचा दौरा करणार

पंतप्रधान मोदी आज वाराणसीचा दौरा करणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार) त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान वाराणसीमधील विणकरांसाठी व्यापार केंद्राचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. याचबरोबर मोदी हे ‘संसद आदर्श ग्राम योजनें‘तर्गत एक गावही दत्तक घेणार आहेत. 
 
लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणादरम्यान वाराणसीमधील विणकरांच्या समस्येचा मोदी यांनी अनेक वेळा उल्लेख केला होता. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी वाराणसीमध्ये उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
 
या पार्श्‍वभूमीवर वाराणसी येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या विशेष सुरक्षा दलास उत्तर प्रदेश पोलिस दल सहकार्य करत आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच वाराणसी भेट असून या भेटीमध्ये वाराणसीमधील विकास प्रकल्पांवर चर्चा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.