1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
  4. पाकचा सीमेवर गोळीबार, पाच भारतीय ठार

पाकचा सीमेवर गोळीबार, पाच भारतीय ठार

जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने पुन्हा खोडसाळपणा केला आहे. रविवारी रात्री पाकिस्तान रेंजर्सने नियंत्रण रेषेवरील पिट्टल, चेनाज, नारायणपूरसह सुमारे 15 भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाक सैन्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांसोबतच सीमा रेषेवरील गावांवरही गोळीबार केला. 
 
पाकने गोळीबार सुरुच ठेवल्याने अखेरीस भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याने निवासी भागालाही लक्ष्य केल्याने यात पाच भारतीय नागरिक ठार झाले तर 10 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.